करोना विरोधात लढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला अनेक जण मोठी आर्थिक मदत करत आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री करिना कपूर-खान, सारा अली खान आणि तैमुर अली खान यांनीही करोना विरोधात लढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारला आर्थिक मदत केली आहे.
करिना कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सरकारला मदत दिल्याची माहिती दिली आहे. करिना कपूर, सैफ आणि सारासोबत तैमुरनेही आर्थिक मदत केल्याने सर्वच स्तरातून तैमुरचे कौतुक केले जात आहे. मुख्यमंत्र्यांनीही ट्वीट करत या चौघांचे आभार व्यक्त केले आहे.
मी, सैफ अली खान आणि तैमुर अली खान आम्ही सर्वांनी केंद्र आणि राज्य सरकारला आर्थिक मदत केली आहे. तुम्ही सर्वांनीही सरकारला आर्थिक मदत करा, असे आवाहन करिना कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन चाहत्यांना केले आहे. करोना विषाणूचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे करिना, सैफ आणि तैमुर घरात वेळ घालवत आहेत. त्यासोबत त्यांनी इतरांनाही घरी राहण्याचे आवाहन केले आहे.