सातारा – विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजल्यानंतर मतदार जागृती अभियान सातारा पालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आले असून मंगळवार दि. 24 रोजी पालिकेच्या छ. शिवाजी सभागृहात या अभियानाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार असल्याची माहिती मतदार सुधारणा मंचचे सचिव व पालिकेचे उपमुख्य अधिकारी संचित धुमाळ यांनी दिली आहे.
या समितीमध्ये मुख्याधिकारी शंकर गोरे हे अध्यक्ष असून 12 जणांची समिती मतदार सुधारणा अभियानासाठी नेमण्यात आली आहे. मतदार जागृकता मंचाचा उद्घाटन समारंभ पालिका प्रशासनाच्या वतीने घेण्यात येणार आहे. यामध्ये मतदार यादीतील नाव शोधणे, नोंदणी करणे, नाव वगळणे, दुरुस्त करणे इ. प्रात्यक्षिक तसेच ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार असून सदर मशिन सभागृहात उपलब्ध केले जाणार आहे. या अभियानासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी आवश्यक उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी केले आहे.