Unseasonal Rain – मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) यासह पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे.
मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/S5G2KHFEzX— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 10, 2024
त्यानुसार, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, छ. संभाजीनगर जिल्ह्याच्या काही भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. त्याचबरोबर येत्या तीन तासांत इतरही काही जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पुणे शहरात पावसाला सुरुवात झाली. वीजांच्या कडकडाटासह जोरदास पाऊस सुरु झाला. काही मिनीटांतच रस्ते जलमय झाले होते.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरासह तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. सुमारे तीन वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे. आकाशात विजेचा कडकडाट सुरु असून शेतकरी वर्गाची पिकं झाकण्यासाठी धावपळ सुरु आहे.
विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.