सरपंच सागर अभंग
विडणी – विडणी गावामध्ये विविध विकासकामांचे भूमिपूजन व उदघाटन शनिवार, दि. 13 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे यांच्या उपस्थिती लाभणार असल्याची माहिती विडणीचे सरपंच सागर अभंग यांनी दिली.
या भूमिपूजन कामांमध्ये निरा उजवा कालवा कॅनलवरील पुल बांधणे ५ कोटी रुपये, पंतप्रधान ग्रामसडक योजना वडले रस्ता डांबरीकरण करणे ४ कोटी २५ लाख, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना काँक्रिटीकरण डांबरीकरण करणे २ कोटी ५ लाख प्राथमिक जिल्हा मार्ग क्रमांक ८८ भाग पुणे पंढरपूर रोड पालखीतळ विडणी ते विद्यानगर अभंगवस्ती रस्ता डांबरीकरण करणे २ कोटी ५० लाख,भाग २४ फाटा मोडकाई मंदिर पवारवस्ती रस्ता डांबरीकरण करणे २ कोटी ५० लाख, कोकरेवाडी ते दंडिलेवस्ती रस्ता काँक्रिटीकरण करणे १५ लाख, श्री जानुबाई मंदिर विद्यानगर ते अभंगवस्ती सभा मंडप बांधणे १५ लाख, जानुबाई मंदिर विद्यानगर ते अभंगवस्ती सभा मंडप बांधणे १५ लाख, अंगणवाडी शेंडेवस्ती इमारत बांधकाम करणे ११ लाख ५० हजार, अंगणवाडी २५ फाटा इमारत बांधकाम करणे ११ लाख ५० हजार, अंगणवाडी लिमटेक इमारत बांधकामकरणे ११ लाख ५० हजार, जि. प. शाळा विद्यानगर वर्ग खोली इमारत बांधकाम करणे २० लाख, श्री मोडुकाई मंदिर पवार वस्ती परिसर पेपर ब्लॉक बसवणे १० लाख जि. प. शाळा विद्यानगर परिसरात पेवर ब्लॉक बसवणे १० लाख या कामांचे भूमिपूजन होणार आहे.
याबरोबर पूर्ण झालेली विकासकामांचे लोकार्पण होणार आहे. यामध्ये ओला व सुका कचरा संकलनासाठी घंटागाडी, नवीन वाचनालय सुसज्ज इमारत बांधकाम व फर्निचर पूर्ण, श्री जय भवानी मंदिर ते ननावरे वस्ती रस्ता काँक्रिटीकरण पूर्ण, अदलिंगे वस्ती अंतर्गत रस्ता, बौध्दनगर स्मशानभूमी रस्ता पुर्ण, आगवणेवस्ती अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण पूर्ण, श्री भैरवनाथ मंदिर ते लक्ष्मी मंदिर रस्ता काँक्रिटीकरण पूर्ण, आसू रोड ते शिनगारे वस्ती रस्ता डांबरीकरण पूर्ण, इंगळे कदम वस्ती अंतर्गत रस्ता डांबरीकरण पूर्ण, तलाठी, एम. एस. ई. बी. पोस्ट ऑफिस, नूतनीकरण पूर्ण, आसू रोड ते वाघमारे वस्ती रस्ता खडीकरण पूर्ण, २४ फाटा ते राऊत वस्ती रस्ता खडीकरण पूर्ण, नरुटेवस्ती ते बापूराव नाळे वस्ती रस्ता खडी करून पूर्ण, आगवणे वस्ती अंतर्गत ब्लॉक बसवणे काम पूर्ण, अंगणवाडी जि. प. शाळा सावतामाळी नगर परिसर पेव्हर ब्लॉक बसवणे काम पूर्ण, २४ फाटा ते चिंचेचा मळा बंदिस्त गटार काम पूर्ण इत्यादी कामे पूर्ण करण्यात आली आहेत.