पिंपरी – नवीन वीजजोडण्या देण्यासाठी महावितरणच्या पुणे परिमंडलाने वेगवान कार्यवाही करीत सन २०२३ मध्ये सर्व वर्गवारीमध्ये विक्रमी २ लाख ३४ हजार ८१० नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत. सन २०२२ च्या तुलनेत तब्बल ५७ हजार ५७९ अधिक वीजजोडण्या दिल्या आहेत. एका वर्षात दोन लाखांपेक्षा अधिक नवीन वीजजोडण्या देण्याची पुणे परिमंडलाने प्रथमच कामगिरी केली आहे. पिंपरी चिंचवड शहरात ७२ हजार ४६६ आणि नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.
पुणे परिमंडलामध्ये दरवर्षी दीड ते पावणेदोन लाख नवीन वीजजोडण्या देण्यात येतात. मात्र, मागीलवर्षी जानेवारीपासून वीजजोडण्या देण्यास नियोजनपूर्वक वेग देण्यात आला. तसेच राहणीमान सुलभता प्रमाणे ग्राहकसेवा गतिमान करण्यात आली आहे. त्यानुसार पुणे परिमंडलामध्ये नवीन वीजजोडण्यांचा वेग वाढविण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले. सन २०२३ मध्ये पिंपरी चिंचवड शहरात ७२ हजार ४६६ आणि नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.
नवीन वीजजोडण्यांसाठी मीटरचा आवश्यकतेनुसार व तत्काळ पुरवठा व्हावा, यासाठी मागील जानेवारीपासून दर आठवड्यामध्ये दोनदा विभागनिहाय नवीन वीजजोडण्या व मीटर उपलब्धता याबाबत आढावा घेणे सुरू केले आहे. त्यामुळे नवीन वीजजोडणी देण्याची प्रक्रिया अधिक गतीमान झाला व जानेवारी ते डिसेंबर २०२३ मध्ये पुणे परिमंडलात तब्बल २ लाख ३४ हजार ८१० नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या.
या तुलनेत सन २०२२ मध्ये एकूण १ लाख ७७ हजार २३१ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या होत्या. त्यात पिंपरी चिंचवड शहरात ७२ हजार ४६६ नवीन वीजजोडण्यांचा समावेश आहे. पुणे परिमंडल अंतर्गत यापूर्वी दरमहा १५ ते १६ हजार वीजजोडण्या देण्याचा वेग होता. तो सन २०२३ मध्ये १९ हजार ५५० वर गेला होता. तर मागील एप्रिलपासून हा वेग २० हजार १०० च्या वर गेला आहे.