IPL 2024 (CSK vs SRH Match 46, Score update) – इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 46 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आज (रविवार, 28 एप्रिल) संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. सनरायझर्स हैदराबाद संघ यंदाच्या मोसमात चमकदार कामगिरी करत आहे. गेल्या सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला असला तरी त्यांचे फलंदाज जबरदस्त फॉर्मात आहेत. दुसरीकडे गेल्या सामन्यात चेन्नई सुपरजायंट्सचा लखनौ सुपर जायंट्सकडून पराभव झाला होता. अशा परिस्थितीत दोन्ही संघ पुनरागमनाच्या शोधात आहेत.
गुणतालिकेतील स्थिती….
हैदराबाद आणि चेन्नई – दोघांनीही आपले मागील सामने गमावले आहेत आणि अशा परिस्थितीत दोन्ही संघ हा सामना जिंकून प्लेऑफसाठी आपला दावा मजबूत करण्याचा प्रयत्न करतील. 2016 चे चॅम्पियन हैदराबाद सध्या 8 पैकी पाच विजय आणि तीन पराभवानंतर 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच वेळी, पाच वेळचा चॅम्पियन सीएसके आठ पैकी चार विजय आणि तेवढ्याच पराभवानंतर आठ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे.
हेड-टू-हेड रेकाॅर्ड्स…
चेन्नई संघाचा हैदराबादविरुद्धचा विक्रम खूपच मजबूत आहे. जेव्हा जेव्हा दोन्ही संघ आमनेसामने आले तेव्हा चेन्नईने वर्चस्व गाजवले. चेन्नई आणि हैदराबाद यांच्यात आतापर्यंत 20 सामने झाले असून त्यात चेन्नईने 14 सामने जिंकले आहेत. तर हैदराबादने केवळ 6 सामने जिंकले आहेत.
पिच रिपोर्ट…
चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल मानली जाते. मात्र या मोसमात आतापर्यंत या मैदानावर खूप धावा झाल्या आहेत. शेवटचा सामना CSK आणि LSG यांच्यातील उच्च धावसंख्येचा सामना होता आणि एकाही फिरकीपटूला विकेट घेता आली नाही. या मोसमात आतापर्यंत या मैदानावर खेळल्या गेलेल्या शेवटच्या चार सामन्यांमध्ये सरासरी 170 च्या आसपास आहे, तर तीन वेळा 200 पेक्षा जास्त धावसंख्या झाली आहे. हैदराबादचे फलंदाज यंदाच्या मोसमात तुफानी फलंदाजी करत असून ते चेन्नईतही चौकार आणि षटकार ठोकू शकतात. या स्टेडियममध्ये आतापर्यंत आयपीएलमध्ये 76 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी चेन्नईने 51 तर इतर संघांनी 25 सामने जिंकले आहेत. यावरून चेन्नई लायन्सला घरच्या मैदानावर पराभूत करणे सोपे जाणार नसल्याचे दिसून येते.
चेन्नईतील हवामान अंदाज…
हैदराबाद आणि चेन्नई यांच्यातील सामन्याच्या दिवशी पावसाची फारशी शक्यता नाही. येथील तापमान 31 ते 32 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सामन्यादरम्यान आर्द्रता दिसून येऊ शकते आणि अशा परिस्थितीत खेळाडूंना उष्णतेचा सामना करावा लागू शकतो.
मागील सामन्यातील निकाल…
या मोसमातील उभय संघांमधील हा दुसरा सामना आहे. यापूर्वी 5 एप्रिल रोजी चेन्नई आणि हैदराबादमध्ये टक्कर झाली होती. ज्यामध्ये हैदराबादने चेन्नईला 165 धावांवर रोखले आणि अवघ्या 18.1 षटकात 6 विकेट्स राखून सामना जिंकला. अशा स्थितीत चेन्नईला त्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे.
दोन्ही संघांचे संभावित Playing 11
चेन्नई सुपर किंग्ज : रुतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, मोईन अली, एमएस धोनी, दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथिशा पाथीराना. (इम्पॅक्ट प्लेयर – शार्दुल ठाकूर)
सनरायझर्स हैदराबाद : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन, अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट. (इम्पॅक्ट प्लेयर- टी नटराजन)
लाइव स्ट्रीमिंग
चेन्नई आणि हैदराबाद यांच्यातील सामन्याचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या माध्यमातून टीव्हीवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. याशिवाय JioCinema द्वारे मॅचचे ‘फ्री’ लाईव्ह स्ट्रीमिंग केले जाईल.