वाठार स्टेशन (प्रतिनिधी) – वाठार स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका (MH 11AB 8185) गुरुवारी (दि. १६ एप्रिल) दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान जळून खाक झाली. सुमारे तीन लाख रुपयाचे नुकसान झाले असून रुग्णवाहिका जळाल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील सेवक सुरेंद्र बाबुराव धुमाळ (वय 45) यांनी वाठार पोलीस स्टेशनमध्ये दिली.
दरम्यान, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास सहाय्यक पोलीस फौजदार गुजर करीत आहेत.