सातारा -जिल्ह्यात करोनामुळे 20 बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गुरूवारी दिली. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबळींची संख्या आता 1160 झाली आहे.
क्रांतीसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांमधील सातारा येथील 66 वर्षीय पुरुष, सासपडे ता. सातारा येथील 76 वर्षीय महिला, कोळोशी अंबवडे ता. सातारा येथील 96 वर्षीय महिला, बोपर्डी ता. वाई येथील 45 वर्षीय पुरुष, तारळे ता. पाटण येथील 70 वर्षीय महिला, पांडे ता. वाई येथील 80 वर्षीय पुरुष, पाल येथील 83 वर्षीय पुरुष,
बेबलेवाडी ता. सातारा येथील 63 वर्षीय महिला, पारगाव येथील 70 वर्षीय पुरुष, साताऱ्यातील बुधवार पेठ येथील 65 वर्षीय पुरुष, तसेच जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये मल्हार पेठ सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, फलटणच्या बुधवार पेठेतील 52 वर्षीय पुरुष, कुडाळ ता. जावळी येथील 65 वर्षीय महिला, कुळकजाई ता. माण येथील 69 वर्षीय महिला, वडोली ता. कराड येथील 63 वर्षीय पुरुष,
लवंगमाची वाळवा जि. सांगली येथील 62 वर्षीय पुरुष, सातारच्या गुलमोहर कॉलनीतील 69 वर्षीय महिला, कराडच्या शनिवार पेठेतील 65 वर्षीय पुरुष, येवती ता. कराड येथील 34 वर्षीय पुरुष, उंब्रज ता. कराड येथील 62 वर्षीय पुरुष अशा एकूण 20 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असे डॉ. चव्हाण यांनी सांगितले.