Sharad Pawar-Supriya Sule voting। लोकसभा निवडणुकांच्या मतदानाचा तिसरा टप्पा आज पार पडत आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या ११ मतदारसंघांचा समावेश आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानास सुरुवात होणार आहे. दरम्यान, राज्यातील सर्वात लक्षवेधी असणाऱ्या बारामती लोकसभा मतदार संघात आजच मतदान होत आहे. याठिकाणी मविआच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या लढत होत आहे.
दरम्यान, बारामतीत शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार हे आपल्या कुटुंबीयांसह मतदानासाठी दाखल झाले आहेत. शरद पवार मतदान केंद्रावर रांगेत राहून मतदान केलं.
#WATCH | NCP-SCP chief Sharad Pawar leaves from a polling booth in Baramati after casting his vote.
NSP-SCP has fielded Supriya Sule from the Baramati seat. NCP has fielded Sunetra Pawar, wife of Maharashtra Deputy CM Ajit Pawar from Baramati#LokSabhaElection2024 pic.twitter.com/bDqb9pDz5I
— ANI (@ANI) May 7, 2024
शरद पवार यांनी बारामतीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. माळेगावातील श्रीमंत शंभूसिंह महाराज हायस्कूलमधील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं. मतदान केल्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
बारामतीमध्ये सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत आहे. काटेवाडी येथील मतदान केंद्रावर ते मतदान केलं.