Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज, ७ मे रोजी मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यातील लोकसभेच्या ११ जागांसाठी आज तिसऱ्या टप्प्यात मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लोकसभेच्या एकूण ४८ जागा असणाऱ्या महाराष्ट्रातील निम्म्या जागांवरील (२४) मतदानाची प्रक्रिया पूर्णत्वास जाईल.
तिसऱ्या टप्प्यात बारामती, सातारा, माढा, सोलापूर, सांगली, लातूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, हातकणंगले, रायगड आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. त्या जागांसाठी एकूण २५८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यांचे भवितव्य २ कोटींहून अधिक मतदार ठरवतील. पहिल्या २ टप्प्यांत मिळून राज्यातील १३ जागांसाठी मतदान झाले. राज्यातील मतदान प्रक्रिया ५ टप्प्यांत होणार आहे. चौथ्या टप्प्यात १३ मे यादिवशी ११ जागांसाठी, तर पाचव्या आणि अंतिम टप्प्यात २० मे यादिवशी १३ जागांसाठी मतदान होणार आहे. अशात कोल्हापूरचे उमेदवार शाहू महाराज यांनीही मतदानाचा हक्क बजावला. येथे शाहू महाराज आणि संजय मंडलिक यांच्यात लढत आहे.
Lok Sabha Election 2024 । हे वाचलं का ?
देशात 9 वाजेपर्यंत कुठे आणि किती झाले ‘मतदान’ ?
तिसऱ्या टप्प्यात 5 माजी मुख्यमंत्रीही निवडणुकीचा रिंगणात
तिसऱ्या टप्प्यात मोदींच्या 10 मंत्र्यांचे ‘भवितव्य’ ठरणार; वाचा यादी
डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी आज नगरमध्ये येणार ; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
‘पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमध्ये बजावला मतदानाचा अधिकार’ पहा व्हिडिओ
MH Lok Sabha Third Phase Voting: राज्यातील 11 जागांसाठी आज मतदान, 258 उमेदवार रिंगणात
Lok Sabha Election 2024 । देशातील 93 जागांवर मतदानाला सुरुवात ; 258 उमेदवार रिंगणात