उच्च शिक्षणाच्या 11 ऑक्टोबरपासून
पुणे – राज्यातील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सीईटी परीक्षा पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सीईटीचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या सीईटी 10 ऑक्टोबर, तर उच्च शिक्षणाच्या सीईटी 11 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत.
यापूर्वी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच 1 ते 15 ऑक्टोबर दरम्यान पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षा घेण्याचे आधी जाहीर केले गेले होते. तर, दुसरीकडे अंतिम वर्षाच्या परीक्षा राज्यभरात 1 ते 21 ऑक्टोबरदरम्यान घेण्यात येणार असल्याचे राज्यभरातील विद्यापीठाने ठरविले आहे. त्या पार्श्वभूमीवर सीईटी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत होती. त्यानंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सुधारित वेळापत्रक जाहीर करीत विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे.
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी प्रथम वर्ष अभ्यासक्रमासाठीची सीईटी परीक्षेच्या वेळापत्रक कोणताही बदल केला नसून 1 ते 20 ऑक्टोबरदरम्यान या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. सविस्तर वेळापत्रक राज्य सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
पाचवर्षीय एलएलबी सीईटी 11 ऑक्टोबर, बीए-बीएस्सी बीएड 18 ऑक्टोबर, बीएड सीईटी 21 ते 23 ऑक्टोबर, बीएड-एमएड 27 ऑक्टोबर, एमपीएड सीईटी 29 ऑक्टोबर, तीन वर्षीय विधी सीईटी 2 ते 3 नोव्हेंबर, बीपीएड सीईटी 4 नोव्हेंबर, एमएड सीईटी 5 नोव्हेंबरला होणार आहे. तर, मॉस्टर ऑफ आर्किटेक्चर सीईटी 27 ऑक्टोबर, पदवी एचएमसीटी 10 ऑक्टोबर, पदव्युत्तर एचएमसीटी 27 ऑक्टोबर आणि एमसीए सीईटी 28 ऑक्टोबरला होणार आहे.