Rohit Pawar voting । लोकसभा निवडणुकांच्या मतदानाचा तिसरा टप्पा आज पार पडत आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या ११ मतदारसंघांचा समावेश आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानास सुरुवात झाली. दरम्यान, राज्यातील सर्वात लक्षवेधी असणाऱ्या बारामती लोकसभा मतदार संघात आजच मतदान होत आहे. याठिकाणी मविआच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या लढत होत आहे.
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीदेखील मतदान केलं. यावेळी त्यांनी आपल्या बारामतीमधील गावी म्हणजेच पिंपळी या गावी मतदान केलं. रोहित पवार यांच्यासोबत त्यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते.
पिंपळी (बारामती) इथं आई, बाबा, पत्नी आणि ताई यांच्यासमवेत सहकुटुंब लोकशाहीतील सर्वांत पवित्र मतदानाचा हक्क बजावला…
तुम्हीही मतदान करा आणि गुंडगिरी, दडपशाहीला गाडून लोकशाही बळकट करा.. pic.twitter.com/u8X0wmH0mB
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 7, 2024
रोहित पवारांनी मतदान केल्यानंतर सोशलमीडियावर एक पोस्ट शेअर करत नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले केले.
हे वाचलं का ?
शरद पवार, सुप्रिया सुळे मतदानासाठी दाखल ; शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क
धैर्यशील मोहिते पाटलांनी केलं मतदान
डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी आज नगरमध्ये येणार ; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
तिसऱ्या टप्प्यात 5 माजी मुख्यमंत्रीही निवडणुकीचा रिंगणात
‘पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमध्ये बजावला मतदानाचा अधिकार’ पहा व्हिडिओ
अजित पवार म्हणाले,’ही तर सुरुवात..अजूनही संध्याकाळीचे 6 वाजलेले नाहीत’
MH Lok Sabha Third Phase Voting: राज्यातील 11 जागांसाठी आज मतदान, 258 उमेदवार रिंगणात
Lok Sabha Election 2024 । देशातील 93 जागांवर मतदानाला सुरुवात ; 258 उमेदवार रिंगणात