दहिवडी, (प्रतिनिधी) – म्हसवड-पुळकोटी रस्त्यावर अचानक वीज तार तुटल्याने शॉर्टसर्किट झाले. यामध्ये आग लागली आणि वाळलेले झाडझुडपे असलेने आगीने रौद्र स्वरूप धारण केले. ही घटना घडली त्यावेळी करण पोरे हे लोकसभेचा प्रचार करण्यात व्यस्त होते. घटना त्यांना प्रचारादरम्यान समजली असता त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत लोकसभा निवडणूक प्रचार सोडून घटनास्थळी धाव घेतली व आग विझवली. यामुळे परिसरात करण पोरे यांच्या प्रसंगावधानाचे कौतुक होत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की म्हसवड-पुळकोटी रस्त्यावर अचानक वीज तार तुटल्याने शॉर्टसर्कीट झाले यामध्ये आग लागली वाळलेले झाडझुडपे व उन्हाळ्याचे दिवस असलेने आगीने रौद्र स्वरूप धारण केले. सदरची घटना घडली त्यावेळी करण पोरे हे आपल्या सवंगड्यांसोबत लोकसभेचा प्रचार करण्यात व्यस्त होते, सदरची घटना त्यांना प्रचारादरम्यान समजली असता त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत या सेनेने लोकसभा निवडणूक प्रचार सोडून घटना स्थळी धाव घेतली व आग विझवण्याचे काम हाती घेतले.
दरम्यान अग्निशामक गाडीसाठी नगरपालिकेशी संपर्क केला, तथापि सदर अग्निशामक प्रचार सभेसाठी येणारे झेड सुरक्षाधारकांच्या सुरक्षेसाठी परगावी गेला होता. मग मागचा पुढचा विचार न करता स्वत:चे वाहनातून टाक्या ठेऊन पाणी आणून आग आटोक्यात आणली. विशेष म्हणजे पुढे थोड्या अंतरावर गॅस गोडावून होते. यावेळी त्यांच्यासोबत ऍड. शुभम पोरे, सागर नामदे, दादा खासबागे, विशाल गोंजारी, विशाल लोखंडे, अदिनाथ पिसे, प्रशांत चव्हाण आदी सवंगड्यांनी परिश्रम घेतले व पुढील अनर्थ टाळण्याचा प्रयत्न केला.