Sanjay Singh : भारतीय कुस्ती संघटनेवर क्रीडा मंत्रालयाच्या कारवाईविरोधात संजय सिंह गट चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी सरकारने केलेल्या कारवाईच्या विरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, सरकारच्या या कारवाईवर पहिलीप्रतिक्रिया दिली आहे.
क्रीडा मंत्रालयाने WFI वर केलेल्या कारवाईनंतर संजय सिंह यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. संजय सिंह म्हणाले की, त्यांनी अद्याप संपूर्ण ऑर्डर वाचलेली नाही, आधी वाचेन आणि नंतर काही बोलू. निलंबित WFI अध्यक्ष म्हणाले, “मला अद्याप पत्र मिळालेले नाही, मी फ्लाइटमध्ये होतो आणि नुकतेच ऐकले आहे की माझ्या एक्टिविटीवर बंदी घालण्यात आली आहे. आता ते पाहतील, सध्या कोणतीही टिप्पणी करणार नाही.” असे म्हटले आहे.
दरम्यान, डब्ल्यूएफआयचे माजी अध्यक्ष आणि कैसरगंजचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेण्यासाठी आले आहेत. जेपी नड्डा यांची भेट घेऊन मोठा निर्णय घेऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, कुस्ती संघटना चालवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे काम सुरू राहणार असल्याचे वृत्त आहे. संजय सिंह यांनी निवडणूक जिंकल्यानंतर लगेचच ही समिती निलंबित केली होती, मात्र आता क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या समितीच्या संरक्षणात कुस्ती संघटना काम करणार आहे.