अभिनेत्री कतरिना आणि विजय सेतुपती स्टारर चित्रपट ‘मेरी ख्रिसमस’ १२ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान कतरिनाने तिचे सुरुवातीचे दिवस आठवले आणि काही किस्से शेअर केले.
कतरिनाने सांगितले की, मलायका अरोराने तिला मॉडेल बनण्यासाठी प्रेरित केले. तिने हे देखील उघड केले की तिची पहिली जाहिरात थलपथी विजयसोबत शूट करण्यात आली होती.
मुलाखतीदरम्यान कतरिना म्हणाली,’जेव्हा मी मुंबईत आले आणि माझ्या करिअरला सुरुवात केली तेव्हा माझे स्वप्न मॉडेल बनण्याचे होते. माझी आयडल त्या काळातील सुपरमॉडेल्स होत्या, ‘मधु सप्रे आणि लक्ष्मी मेनन’ मलायका अरोराही त्या काळात मॉडेलिंगच्या जगात आपले नाव केले होते.
तिने पुढे सांगितले,’मला या तिघींचे काम खूप आवडले आणि त्यांच्याबद्दल मला नेहमीच आदर होता. त्यांच्या कामातून मी नक्कीच प्रेरणा घेतली आहे. सुरुवातीच्या काळात मुंबईतील जाहिरात एजन्सींची यादी तयार केली होती आणि काम मिळेल या आशेने मी सर्व एजन्सींना भेट देत होते.’ असं म्हणत तिने जुन्या आठवणी ताज्या केल्या.