IIT Kanpur : कानपूरमध्ये आयआयटीचे (IIT Kanpur) ज्येष्ठ प्राध्यापक समीर खांडेकर (Sameer Khandekar) यांचे एका कार्यक्रमात हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले आहे. ५३ वर्षीय समीर खांडेकर हे माजी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात आरोग्याच्या विषयावर व्याख्यान देत होते . मात्र त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन ते खाली कोसळले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
विशेष म्हणजे माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात समीर आरोग्यविषयक विषयांवर चर्चा करत होते. प्रत्येकाला काळजी घेण्यास त्यांनी सांगितले. भाषण सुरु असतानाच त्यांची तब्येच बिघडली आणि ते स्टेजवर कोसळले. त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.
समीर खांडेकर यांची कारकीर्द
समीर खांडेकर हे कानपूरच्या मॅकेनिकल इंजिनिरिंयग (Mechanical Enginerring) विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्याचसोबत स्टुडंट अफेअरचे डीन म्हणून कार्यरत होते. समीर खांडेकर हे मध्यप्रदेश, जबलपूरचे होते. त्यांनी २००० साली आयआयटी कानपूरमधून बीटेक पदवी प्राप्त केली. त्यानंतर २००४ साली जर्मनीतून (Germany)पीएचडी पूर्ण के त्यानंतर २००९ साली सहयोगी प्राध्यापक आणि २०१४ साली ते प्राध्यापक बनले. २०२० साली त्यांच्याकडे मॅकेनिकल इंजीनियरिंग विभागाचे प्रमुखपद सोपविण्यात आले होते.
दरम्यान, प्रा. समीर खांडेकर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक मुलगा असे कुटुंब आहे. समीर खांडेकर यांचा मुलगा परदेशात आहे. त्यामुळे मुलगा भारतात परतल्यावरच समीर खांडेकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.