सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे, असे समजले आहे. स्टार किडसना लॉंच करण्याचे कॉन्ट्रॅक्ट घेतलेल्या करण जोहरच्याच सिनेमातून त्याला लॉंच केले जाणार आहे. मात्र तो ऍक्टर म्हणून पदार्पण करणार नाही, तर असिस्टन्ट डायरेक्टर म्हणून काम करायला सुरुवात करणार आहे.
करण जोहरच्या आगामी सिनेमात रणवीर सिंह आणि आलिया भट हे लीड रोलमध्ये दिसणार आहेत. या वर्षी जून किंवा जुलैमध्ये या सिनेमाचे शुटिंग सुरू होणार आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी ऍक्टिंग करायची की फिल्म मेकिंग करायचे हे अद्याप इब्राहिमने ठरवलेले नाही. सध्या तरी त्याला फिल्म मेकिंगच्या प्रोसेसबद्दल माहिती करून घ्यायची आहे.
गेल्या काही दिवसांपासून तो सारखा करण जोहरच्या ऑफिसमध्ये घुटमळताना दिसला आहे. त्यामुळे त्याच्या पदार्पणाची चर्चा जोरात सुरू झाली. इब्राहिमने हृतिक रोशनप्रमाणे धमाकेदार डेब्यू करावा, अशी सैफची इच्छा आहे. इब्राहिमच्या अगोदर सैफची कन्या सारा अली खानने पदार्पण करून आपले स्थान घट्ट जमवलेदेखील आहे. मात्र, इब्राहिमला ऍक्टर म्हणून तयार होण्यासाठी अजून बराच होमवर्क करावा लागणार आहे.