पुणे -जान्हवी कपूर सध्या धाकटी बहीण खुशी आणि सावत्रबहीण अंशुलाबरोबर लंडनमध्ये आहे. ती सध्या तिचा आगामी सिनेमा “हेलन’ची तयारी करते आहे. तिचा हा “हेलन’ सिनेमा मल्याळममधील राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा “हेलन’चा हिंदी रिमेक असणार आहे.
View this post on Instagram
मथुकुटी झेवियरच्या डायरेक्शनखाली तयार होणाऱ्या “हेलन’मध्ये जान्हवी एक साधीसुधी, काम करणारी मुलगी असणार आहे. काही अपघातामुळे ती एका सुपर मार्केटमधील फ्रिझरमध्ये अडकते आणि तिला तिथे लॉक व्हावे लागते, अशी या सिनेमाची कथा आहे.
View this post on Instagram
शून्याच्या खालील तापमानात राहायला लागल्याने जान्हवीला स्वतःच्या भीतीवर विजय मिळवून टिकून राहायचे आहे. या सिनेमाची तयारी म्हणून तिला फ्रिझरमध्ये स्वतःला बंदिस्त करून घेण्याची सवय करून घ्यायची आहे. “हेलन’ची निर्मिती बोनी कपूर स्वतः करणार आहे. इतक्या लहान वयात जान्हवीला सर्व्हायव्हर ड्रामा करण्याचे मोठे आव्हान पेलायचे आहे, असे बोनी कपूरने सांगितले.
View this post on Instagram
जर या संकटामध्ये काही चालबाजी केल्याचे प्रेक्ष्कांना लक्षात आले, तर ते हा सिनेमा बघणार नाहीत. म्हणून फिझरमध्ये लॉक करण्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे बोनी कपूरने सांगितले.
View this post on Instagram