मुंबई – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील सामील होत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह एकूण 9 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. यानंतर आता मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या या मंत्र्यांना कोणती खाती दिली जाणार यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे.
महाराष्ट्राची राजकीय संस्कृती चिखलात तुडवणारी…
मराठी माणसाची अस्मिता असलेल्या शिवसेनेला आपापसात झुंजायला लावून विकृत आनंद घेणारी… आणि हाच प्रयोग आता राष्ट्रवादीच्या बाबतीत करणारी महाराष्ट्रातली एकमेव शक्ती आणि व्यक्ती कोण असावी?— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 4, 2023
मात्र, त्यापूर्वीच या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार याची संभाव्य यादी समोर आली आहे. त्यामुळे सध्या गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान खाते वाटपाची चर्चा सुरु असतांनाच शिंदे गटातील नेत्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. अजित पवारांच्या या मोठ्या राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अशामध्ये आता या बंडखोरीचे सर्व खापर आमदार रोहित पवार यांनी थेट भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडले आहे.
रोहित पवार यांनी ट्विट केले आहे की,’महाराष्ट्राची राजकीय संस्कृती चिखलात तुडवणारी… मराठी माणसाची अस्मिता असलेल्या शिवसेनेला आपापसात झुंजायला लावून विकृत आनंद घेणारी… आणि हाच प्रयोग आता राष्ट्रवादीच्या बाबतीत करणारी महाराष्ट्रातली एकमेव शक्ती आणि व्यक्ती कोण असावी?’ असं ट्विट करत प्रश्न उपस्थित केला आहे.