थायलंडच्या पबमध्ये वाजले ‘राष्ट्रवादी पुन्हा’ गाणे?

पुणे – विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तास्थापनेवरून महानाट्य रंगले होते. अखेर राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेने एकत्र येत राज्यात महाविकासआघाडीचे सत्तास्थापन केली. व शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. यामध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भूमिका महत्वपूर्ण होती. एवढेच नव्हे संपूर्ण निवडणुकीदरम्यान शरद पवार हे काय रसायन आहे आणि त्यांचे पॉवरबाज राजकारण काय असते, याची प्रचितीच यानिमित्ताने पुन्हा सर्वांना आली.

राष्ट्रवादीने निवडणुकीत नवमतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘राष्ट्रवादी पुन्हा’ हे गाणे लॉन्च केले होते. हे गाणे तरुणांमध्ये तसेच सोशल मीडियावरही चांगलेच लोकप्रिय झाले. मात्र, आता राष्ट्रवादी पुन्हा हे गाणे परदेशातही प्रसिद्ध असल्याचे एका व्हिडिओतून समोर आले आहे. एका युझरने थायलंडच्या टॉनी पबमध्ये राष्ट्रवादी पुन्हा हे गाणे वाजविल्याचा दावा केला आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

(हा व्हिडीओ व्हायरल आहे)

Leave A Reply

Your email address will not be published.