राम आपला एकट्याचा नव्हता, तर तो सगळ्यांचा होता…

मुंबई – देशातील ऐतिहासिक राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी आता पूर्ण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थोड्याच वेळात राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः या कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी केली. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी अनेक दिग्ज मान्यवर आज अयोध्येत दाखल झाले आहेत.

दरम्यान, अयोध्येत आज होत असलेल्या राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याचं औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक जबरदस्त ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. रोहित पवार म्हणाले कि, “रामप्रहरापासून आपला दिवस सुरू होतो. जय जय राम कृष्ण हरी हा जगण्याचा मंत्र असतो. रामराम ही एकमेकांच्या ओळखीची खुण असते. साने गुरूजी म्हणायचे, ‘रामराम म्हणताना तू ही राम आणि मी ही राम हे अपेक्षित असतं’. आपण पिढ्यान् पिढ्या असेच वागत आलो आहोत’.

रोहित पवार पुढे म्हणतात, ‘राम आपला एकट्याचा नव्हता, तर तो सगळ्यांचा होता आणि राहणार. शेवटचा श्वास घेताना राम म्हणणाऱ्या गांधींजींचा राम, वारकऱ्यांना सामाजिक समता शिकवणारे ज्ञानदेव तुकाराम. आपल्याच शेतात अयोध्या समजून शेतात राबणारा एखादा सखाराम. राम सगळ्यांचा असण्यातच राम आहे’. अश्या आशयाचे ट्विट रोहित पवार याणी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.