तुमच्या वडिलांना मुख्यमंत्र्यांची खूर्ची कशी मिळाली ?

अभिनेत्री कंगना रानौतने थेट आदित्य ठाकरेंवर खोचक टीका

मुंबई: कोरोना संकटाने देशभर हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्राचे सरकारही ‘कोरोना’चा पराभव करण्यासाठी शर्थ करीत आहे. बहुधा, महाराष्ट्र सरकारचे यश, लोकप्रियता ज्यांना खुपते त्यांना सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरू केले आहे, अशी टीका पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. यातच आता अभिनेत्री कंगना रानौतने थेट आदित्य ठाकरेंवर  ट्विट करत टीका केली आहे.

कंगनाच्या डिजिटल टीमने पहिल्याच ट्विटमध्ये लिहिले आहे, ‘हाहा, पहा गलिच्छ राजकारणावर कोण बोलत आहे. तुमच्या वडिलांना मुख्यमंत्र्यांची खूर्ची कशी मिळाली, हे देखिल गलिच्छ राजकारणावरील केस स्टडी आहे सर. हे सारे सोडा, तुम्ही तुमच्या मुख्यमंत्री वडिलांना सुशांतच्या मृत्यूविषयी हे प्रश्न विचारा.


काय म्हणाली अभिनेत्री कंगना रानौत

१.रिया चक्रवर्ती कुठे आहे?”
२ .मुंबई पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूबाबत एफआयआर दाखल का नाही केला?
३ जेव्हा सुशांतच्या जिवाला धोका असल्याची फेब्रुवारीतच एक तक्रार दाखल झालेली होती, मग मुंबई पोलिसांनी एका दिवसात सुशांतने आत्महत्या केल्याचे घोषित करण्याची घाई का केली?४.आपल्याकडे फॉरेन्सिक एक्सपर्ट किंवा सुशांतच्या मोबाईलची माहिती का नाहीय? ज्याद्वारे मृत्यूच्या एक आठवडा आधी सुशांतने कोणाकोणाला फोन केले होते? कोणाकोणाशी बोलला होता?
५. बिहारचे आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना क्वारंटाईनच्या नावावर लॉक करून का ठेवले आहे?

 

Leave A Reply

Your email address will not be published.