Heat waves । मागच्या काही दिवसापासून उन्हाचा पारा चांगलाच वाढलाय. भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार, देशाच्या ईशान्येकडील काही राज्ये आणि दक्षिण भारतातील राज्यांमध्ये लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार नाही. आसाम, मेघालय, त्रिपुरा, केरळ, माहे आणि किनारी कर्नाटकात आर्द्रता आणि उष्ण हवामानामुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागत असल्याचे विभागाने म्हटले आहे.
13 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा Heat waves ।
IMD ने 13 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केलाय. सर्वात तीव्र उष्णतेची लाट गंगा, पश्चिम बंगाल, बिहार आणि झारखंड, ओडिशाच्या काही भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. पूर्व उत्तर प्रदेश आणि सौराष्ट्र आणि कच्छलाही उष्ण रात्रीचा सामना करावा लागणार आहे. पूर्व उत्तर प्रदेश, सौराष्ट्र आणि कच्छ, हिमालयीन पश्चिम बंगाल, कोकण आणि गोवा, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल, किनारी आंध्र प्रदेश आणि यानाम, तेलंगणा, रायलसीमा आणि अंतर्गत कर्नाटकात लोकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
बिहारमधील 18 जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आहे. पाटणा, औरंगाबाद, शेखपुरा, नवादा, मुझफ्फरपूर या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट असणार आहे. लखनौ हवामान केंद्राने पूर्व उत्तर प्रदेशात उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट इशारा दिला आहे. दिल्लीतील तापमान 40 च्या पुढे जात असून सध्या पावसाची शक्यता नाही.
दिल्ली-हरियाणात धुळीचे वादळ Heat waves ।
IMD नुसार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पंजाबमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, ताशी 40-50 किमी वेगाने वारे आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट होणार आहे.
उत्तर प्रदेशच्या काही भागात जोरदार वारेही वाहणार आहेत. दिल्ली-एनसीआर, हरियाणा आणि चंदीगडमधील लोकांना विजेसह धुळीच्या वादळाचा सामना करावा लागणार आहे. पश्चिम राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, किनारी आंध्र प्रदेशात विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
अरुणाचल प्रदेश, केरळ, हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि लक्षद्वीपमध्ये विजांचा कडकडाट होणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये जोरदार पाऊस होणार आहे. उत्तर हरियाणा आणि उत्तर-पश्चिम राजस्थानमध्ये हलका पाऊस आणि वादळ होण्याची शक्यता आहे.