Ramesh Kadam support mahayuti । मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. जोरदार शक्तिप्रदर्शन करत रमेश कदम यांच्याकडून भाजप आणि नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर करण्यात आला. मोहोळ मध्ये कदम यांनी आपली भूमिका जाहीर करण्यासाठी एक सभा बोलावली होती. या सभे दरम्यान त्यांनी महायुतीतला पाठिंबा दर्शवलाय.
एमआयएमकडून रमेश कदम यांना लोकसभेची ऑफर Ramesh Kadam support mahayuti ।
चार दिवसापूर्वी भाजप नेते संजय क्षीरसागर हे राष्ट्रवादी शरद पवार गटात गेल्यानंतर माजी आमदार रमेश कदम यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. एमआयएमकडून रमेश कदम यांना लोकसभेची ऑफर देखील देण्यात आली होती. ही चर्चा पुढे न गेल्याने रमेश कदम यांनी सोलापुरात उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. मात्र रमेश कदम कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर रमेश कदम यांनी आपली भूमिका जाहीर करत महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभेसाठीच पाठिंबा ; विधासभा स्वतंत्र Ramesh Kadam support mahayuti ।
याविषयी बोलताना रमेश कदम यांनी, “लोकसभेपुरता माझा भाजप आणि नरेंद्र मोदींना पाठिंबा आहे मात्र आगामी विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याचे मतं त्यांनी यावेळी व्यक्त केले. तर रमेश कदम हा माझा जीवश्च कंठश्च मित्र असून आगामी काळात ते दिसून येईल अशी प्रतिक्रिया मंत्री तानाजी सावंत यांनी दिली.
मोहोळ मतदारसंघातील विकासाचे मूळ प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीपा पाठिंबा देत आहे. देशाच्या विकासात आपला खारीचा वाटा असावा या दृष्टीकोनातून फक्त लोकसभेकरता महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. राजकारणात भावनिक होऊन चालत नाही. लोकसभा निवडणुकीनंतर मात्र या मतदारसंघात स्वतंत्र काम करणार आहे. माझे स्वतंत्र अस्तित्व कायम ठेवणार आहे. येणारी 2024 ची निवडणूक मी लढवणार आहे. हा पाठिंबा फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आहे.
रमेश कदम हे 2014 साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर मोहोळमधून निवडून आले होते. निवडून आल्यानंतर त्यांनी मागेल त्याला टँकर, मागेल त्याला शेततळे आणि मागेल त्या ठिकाणी रस्ता दिल्याने चांगलेच लोकप्रिय झाले. आण्णाभाऊ साठे आर्थिक महामंडळामध्ये झालेल्या घोटाळ्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.