Baba Siddique – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस पक्षाला रामराम केलाय. बाबा सिद्दीकी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.
I joined the Indian National Congress party as a young teenager and it has been a significant journey lasting 48 years. Today I resign from the primary membership of the Indian National Congress Party @INCIndia with immediate effect. There’s a lot I would have liked to express…
— Baba Siddique (@BabaSiddique) February 8, 2024
बाबा सिद्दीकी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले आहे की,’मी माझ्या तरुणपणात काँग्रेस पक्षात सामील झालो. मागच्या 48 वर्षांचा हा एक महत्त्वाचा प्रवास आहे. आज मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा तातडीने राजीनामा देत आहे. मी काँग्रेस का सोडत आहे, याबाबत माझं मत मला व्यक्त करायला खूप आवडलं असतं. पण ते म्हणतात ना की काही गोष्टी न सांगितलेल्या बऱ्या असतात. तसंच आहे, या राजीनाम्याबाबत मी फारसं काही बोलणार नाही. माझ्या या प्रवासात सहभागी झालेल्या सर्वांचे मी आभार मानतो, असं बाबा सिद्दीकी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
बाबा सिद्दीकी हे मुंबई काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते समजले जातात. आगामी लोकसभा निवडणुकीआधी त्यांचा राजीनामा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातो आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे , त्यामुळे आगामी लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला फायदा होण्याची शक्यता आहे.