Baby John Poster : बॉलीवूड अभिनेता वरूण धवनचा ‘बेबी जॉन’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्यापूर्वी या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. चित्रपटाच्या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टरमध्ये वरूणाचा खतरनाक अवतार दिसत आहे.
वरुण धवनने बुधवारी अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘बेबी जॉन’चे आणखी एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये वरूणच्या हातामध्ये शस्त्र दिसत असून तो चिडलेला दिसत आहे. वरुण धवन पहिल्यांदाच या लुक पाहायला मिळत आहे. या पोस्टरच्या बॅकग्राऊंटमध्ये विलन दिसत आहे. बेबी जॉनचे पोस्टर शेअर करत वरुण धवनने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘घट्ट पकडून ठेवा. प्रवास एकदम खतरनाक होणार आहे. बेबी जॉन 31 मे रोजी तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये येत आहे.’
View this post on Instagram
वरुणच्या या चित्रपटाचेपोस्टर सध्या चांगेलच व्हायरल होत आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमधील वरुण धवनचा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. या पोस्टरनंतर वरुणच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटात वरुण धवनसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेश आणि पंजाबी अभिनेत्री वामिका गब्बी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाद्वारे कीर्ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. हा चित्रपट 31 मे 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.