मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवनात हा शपथविधी पार पडला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं अभिनंदन केलं. तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीदेखील नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याचे अभिनंदन केले आहे.
श्री @Dev_Fadnavis जी को महाराष्ट्र के मुख्यमंत्री और श्री @AjitPawarSpeaks को प्रदेश के उपमुख्यमंत्री के रूप में शपथ लेने पर हार्दिक बधाई।
मुझे विश्वास है कि यह सरकार महाराष्ट्र के विकास और कल्याण के प्रति निरंतर कटिबद्ध रहेगी और प्रदेश में प्रगति के नये मापदंड स्थापित करेगी।
— Amit Shah (@AmitShah) November 23, 2019
दरम्यान, अमित शहा यांनी ट्विट करत, मला विश्वास आहे की, हे सरकार महाराष्ट्राच्या विकास आणि कल्याणासाठी सातत्याने वचनबद्ध राहिल असे म्हटले आहे. तसेच राज्यात प्रगतिचे नवे मापदंड निर्माण करेल असेही शहा यांनी म्हटले आहे.
Congratulations to @Dev_Fadnavis Ji and @AjitPawarSpeaks Ji on taking oath as the CM and Deputy CM of Maharashtra respectively. I am confident they will work diligently for the bright future of Maharashtra.
— Narendra Modi (@narendramodi) November 23, 2019
तर तिकडे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याबद्दल त्यांचे अभिनंदन. दोघंही मिळून महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करतील याचा मला विश्वास आहे, अशा आशयाचं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.