प्रियांका चोप्राने आंतरराष्ट्रीय ख्याती मिळवली आहे. तिचे फॅन्स केवळ भारतातच नव्हे तर जगात अनेक देशांमध्ये आहेत. तिचे फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत असतात. जगभरात सर्वाधिक सर्च केली जाणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राच असल्याचे अलिकडेच झालेल्या एका सर्व्हेमध्ये आढळून आले आहे. ऑ
क्टोबर 2019 मध्ये 27 लाख वेळा प्रियांका चोप्राला इंटरनेटवर सर्च केले गेले आहे. या लिस्टमध्ये प्रियांकानंतर सलमान खानचा नंबर लागतो. सलमानला 18.3 लाख वेळा सर्च केले गेले होते. हा सर्व्हे ऑक्टोबर 2018 ते ऑक्टोबर 2019 दरम्यान केला गेला होता. प्रियांका चोप्राला दरमहिन्याला 4.2 मिलीयन लोक सर्च करत असतात, असेही या सर्व्हेने म्हटले आहे.
पुरुष कलाकारांच्या बाबतीत बोलायचे तर सलमान खान नंतर शाहरुखनंतर दिवंगत अभिनेते ओमपुरी यांचा क्रमांक लागला आहे. तर अभिनेत्रींमध्ये प्रियांका चोप्रानंतर दीपिका पदुकोण आणि सनी लिओनचा सर्च केला जातो, असे या सर्व्हेने म्हटले आहे.
याच लिस्टमध्ये अमिताभ बच्चन, रणवीर सिंह, कतरिना कैफ, आलिया भट आणि इमरान हाश्मी हे देखील इंटरनेटवर सर्च केले जाणारे आघाडीचे कलाकार आहेत.