Rahul Gandhi Interects With Coolies : काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे मागील काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे. भारत जोडो यात्रेनंतर त्यांनी लोकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. कधी ते ट्रक ड्रायव्हर बनले तर कधी शेतकरी बनत त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना हात घातला. त्यानंतर आता राहुल गांधी हे दिल्लीच्या आनंद विहार रेल्वे स्थानकावर ‘हमाल’ (Coolie) बनल्याचे पाहायला मिळाले. त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी आज सकाळी दिल्लीच्या आनंद विहार रेल्वे स्थानकावर पोहोचले, जिथे त्यांनी ‘हमाल’ (Coolie) लोकांची भेट घेतली. यादरम्यान राहुल गांधी यांनी हमालांची (Coolie) वेशभूषा करताना दिसून आले.
कुली भाइयों के बीच जननायक pic.twitter.com/nor4tSyoR8
— Congress (@INCIndia) September 21, 2023
एवढेच नाही तर त्यांनी कपड्यांसोबत हमालांचा (Coolie) बॅच देखील लावला. हे सर्व केल्यानंतर राहूल गांधी यांनी स्टेशनवर असणाऱ्या लोकांचे सामान घेऊन जातानाही दिसून आले.
राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर हमाल (Coolie) आणि ऑटोचालक खूप आनंदी दिसत होते. यावेळी ते म्हणाले की, राहुल गांधी आम्हाला भेटायला आले याचा मला खूप आनंद झाला आहे. त्यांनी सांगितले की राहुल गांधी यांनी,”त्यांच्या सर्व समस्या सरकारसमोर ठेवतील आणि समस्या सोडवल्या जातील असे आश्वासन दिल्याचे तिथे उपस्थित असणाऱ्या हमालांनी (Coolie) म्हटले.