काटेवाडी (गोकुळ टांकसाळे) – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल आमदार गोपीचंद पडळकर यांनी अपशब्द वापरल्याबद्दल काटेवाडी (ता. बारामती) या ठिकाणी गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करून आमदार पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबादी करत पडळकर यांचा निषेध नोंदवला.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल अपशब्द वापरले त्या निषेधार्थ आज बुधवारी सायंकाळी पाच वाजता काटेवाडी येथील अहिल्या चौकामध्ये पडळकर यांच्या प्रतिमेस जोडे मारून पडळकर यांच्या विरोधात मोठ्याने घोषणा देत मोठे आंदोलन उभा करून पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
यावेळी सरपंच विद्याधर काटे, उपसरपंच श्रीधर घुले, तंटामुक्तीचे अध्यक्ष के.टी. जाधव, संभाजी ब्रिगेडचे कोषाध्यक्ष अमोल काटे, अनिल काटे, शितल काटे, प्रकाश टेंगले, दिलीप काटे, रणजीत गायकवाड, मिलिंद काटे, संजय शेळके, सागर भिसे, धनंजय काळे, धनंजय भिसे, निखिल काटे.
यावेळी निषेध व्यक्त करताना अनेकांनी वक्तव्य केले त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे संपूर्ण राज्याला नव्हे तर देशाला देखील माहित आहे की ते खऱ्या अर्थाने विकासाभिमुख नेतृत्व आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्यांनी आजपर्यंत राज्याच्या विकासाचा विचार करून खऱ्या अर्थाने संपूर्ण जनतेला न्याय दिला आहे.
राज्यातील जनता पूर्णपणे जाणून आहे की अजित पवार हे विकासाच्या बाबतीत कसलीही तडजोड न करणारे नेतृत्व आहे. राज्यातील जनता डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचून तळागाळातील जनतेला विकासामध्ये कसे आणले जाईल याबाबत ते कायम आग्रही आहेत.
आजपर्यंतच्या काळामध्ये फक्त विकास आणि विकास हेच ध्येय डोळ्यासमोर अजित पवार यांनी ठेवल्याने खऱ्या अर्थाने संपूर्ण राज्याचा नेता म्हणून त्यांची ख्याती निर्माण झालेली आहे. अशा या उत्तम प्रकारे प्रशासन चालवणाऱ्या व चांगल्या प्रकारे राज्याचे धुरा सांभाळणाऱ्या व्यक्तीस आमदार गोपीचंद पडळकर यांनी अपशब्द वापरल्याने काटेवाडी येथील ग्रामस्थांनी पडळकर यांच्या विरोधात आंदोलन उभा करून जोरदार निषेदाच्या घोषणा देत पडळकर यांच्या प्रतिमेस जोडमारो आंदोलन केले.
पडळकर यांना त्यांच्या भागात देखील विकास करता आला नाही त्यांनी अजित पवार यांची काय बरोबरी करावी अशा प्रकारे गावातील तमाम नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध व्यक्त केला.