Bollywood News – अभिनेता आमिर खानच्या थ्री इडियट्स या चित्रपटातील प्रत्येक पात्र आजही सर्वांना तितके आवडतात. या चित्रपटातील ग्रंथपाल दुबेची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेले अभिनेता अखिल मिश्रा यांचं निधन झालं आहे.
वृत्तानुसार, कामावर असताना इमारतीवरून पडून अखिल मिश्राचा मृत्यू झालाय. अखिल मिश्राच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने इंडस्ट्रीत खळबळ उडाली असून चाहत्यांना या बातमीवर विश्वास बसत नाहीये.
बाल्कनीतून पडून अखिल मिश्रा यांचा मृत्यू
वृत्तानुसार, अभिनेता अखिल मिश्रा हैदराबादमध्ये एका प्रोजेक्टसाठी शूटिंग करत होते. बाल्कनीजवळ काम करत असताना ते एका उंच इमारतीवरून पडले. अखिल यांच्या पश्चात त्याची पत्नी सुझान बर्नर्ट आहे, ज्या जर्मन अभिनेत्री आहे. अखिलने अखेरचा श्वास घेतला तेव्हा ते हैदराबादमध्ये होते. “माझे हृदय तुटले आहे, माझा जीवनसाथी गेले,” असेही त्यांनी सांगितले.
अखिल यांनी अनेक टीव्ही शो आणि चित्रपट केले होते…
– अखिलने टीव्हीवरही अनेक कार्यक्रम केले. उत्तरन, उडान, सीआयडी, श्रीमान श्रीमती, हातिम आणि इतर अनेक लोकप्रिय टेलिव्हिजन कार्यक्रमांचा भाग ते होते.
-अखिल अनेक चित्रपटांमध्येही दिसले. ‘डॉन’, ‘गांधी’, ‘माय फादर’, ‘शिखर’, ‘कमला की मौत’, ‘वेल डन अब्बा’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या.
-अखिलने ‘3 इडियट्स’ मधील ग्रंथपाल दुबे यांच्या छोट्या पण संस्मरणीय भूमिकेमुळे प्रचंड लोकप्रियता मिळवली. आमिर खान, शर्मन जोशी, करीना कपूर खान, आर माधवन, बोमन इराणी आणि इतर अनेकांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या.
-‘उत्तरन’ या लोकप्रिय शोमध्ये उमेद सिंग बुंदेला ही व्यक्तिरेखा साकारूनही त्याने आपली छाप सोडली.