सासवड – पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या ओबीसी सेल अध्यक्षपदी पिंपळे (ता. पुरंदर) येथील विलास बबन चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष प्रदीप गारडकर यांनी नुकतेच दिले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री धनंजय मुंडे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुरंदर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी मदत करणार असल्याचे विलास चव्हाण यांनी निवडीनंतर सांगितले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष वामन जगताप, तालुकाध्यक्ष उत्तम धुमाळ, माजी उपसभापती ईश्वर बागमार, युवकचे अध्यक्ष अमित झेंडे, शिवाजी साळुंखे, धोंडीबा कटके, नाना सस्ते, भाऊसाहेब कामठे, प्रकाश फरतडे उपस्थित होते.