शिक्रापूर – हिवरे कुंभार (ता. शिरूर) येथील सीताराम शंकर गायकवाड (वय ५३, रा. हिवरे कुंभार ता. शिरूर) यांनी घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घरातील सर्वजण बाहेर गेले असताना घडली आहे.
त्यांच्या घरातील लहान मुळल शाळेतून घरी आल्यानंतर सीताराम यांनी गळफास घेल्याचे समोर आले. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला असून,
याबाबत बापू सुरेश गायकवाड (वय ३३, रा. हिवरे कुंभार ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे माहिती दिल्याने पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस पोलीस हवालदार मंगेश लांडगे हे करत आहे.