आमदरांसह केला पुरंदरचा दौरा
सासवड – राज्यामध्ये दुष्काळाची तीव्रता वाढत असून यामध्ये शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तर दुष्काळी परिस्थितीचा संपूर्ण आढावा आम्ही घेतला असून राज्यातील आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविकां यादेखील संपावर जाणार आहे. सरकार हे संवेदन नाही दुष्काळी परिस्थितीमध्ये डॉ. मनमोहन सिंग सरकारने त्याकाळी 70 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती. सरकारने सरसकट कर्जमाफी करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली
खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संजय जगताप यांचा दौरा मंगळवारी (दि. 28) झाला. यावेळी सासवड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत खासदार सुळे आणि आमदार जगताप यांनी विविध प्रश्नांवर माहिती दिली. यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष अभिजीत जगताप, सुदामराव इंगळे, विजयराव कोलते, गौरी कुंजीर, वामन कामठे, संजय चव्हाण, उपस्थित होते.
यावेळी, खानवडी या महात्मा फूले यांच्या मुळ गावी राज्य शासन व केंद्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने मुलींसाठी होणार्या ज्योती सावित्री इंटरनॅशनल स्कूलच्या बांधकामाची पाहणी, वाघापूर येथील पुरंदर उपसाच्या पंपगृहाची पाहणी, सासवड येथे आशा सेविका सोबत चर्चा करुन त्यांच्या अडचणी खासदार सुळे आणि आमदार जगताप यांनी जाणून घेतल्या. तसेच खासदार सुळे व आमदार जगताप यांच्या हस्ते आशा सेविकांना ग्रामीण संस्था आणि पुरंदर ग्राहक भांडाराच्या वतीने किराणा किटचे वाटप करण्यात आले.
सासवड येथील कर्हा नदीच्या पुलावरील काम अपूर्ण असून त्यासाठी निधी प्राप्त होत नाही. त्याचबरोबर प्रशासकीय इमारतीसाठी देखील निधी मिळत नाही. यामुळे हे दोन्ही प्रकल्प अपूर्ण अवस्थेत असल्याचे खासदार सुळे यांनी नमूद केले..
जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवलेला नाही
महाविकास आघाडीच्या सरकारने लोकसभेच्या जागांबाबत अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारचा फॉर्म्युला ठरवलेला नाही सध्या अनेक राज्यांमध्ये निवडणुका असून यासाठी काँग्रेसचे नेते प्रचारासाठी गेलेले आहेत ते आल्यानंतर निवडणुकी संदर्भात चर्चा होईल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.
पाण्याबाबत राजकारण नको
पुरंदर उपसा आणि जनाई उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्याबाबत राजकारण करायचे नाही. लाभार्थी प्रत्येक शेतकर्याला गतवर्षी प्रमाणे पाणी देण्यासाठी नियोजन केले आहे. या योजनांच्या पाण्यामुळे लाभक्षेत्रात आणि विशेषतः पूर्व भागात मोठा बदल झाला आहे. येथील ऊस क्षेत्र, फळबागांमध्ये मोठी वाढ झाली आहे. फळप्रक्रिया उद्योग वाढले असून यामुळे या भागाचा कायापालट झाला आहे. त्यामुळे पुरंदर उपसाच्या पाण्याबाबत कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे आणि पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी केले आहे.