सासवड, (प्रतिनिधी) – बारामती लोकसभामतदार संघाच्या अंतर्गत येणार्या पुरंदर-हवेली मतदारसंघात 2019 ला पुरंदर 60.48 टक्के मतदान झाले होते तर आता 2024 ला 53.96 टक्के मतदान झाल्याने मतदान 6.52 टक्क्यांनी घटले आहे. यामुळे दिग्गजांची धाकधूक वाढली आहे. साधारण 5 टक्क्यांची घटही निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे विरुद्ध आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यात लढाई आहे. मात्र, यामध्ये शरद पवार आणि अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
बारामतीच्या मतदानाचा पॅटर्न बरेच काही सांगणारा आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणार्या पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघामध्ये संपूर्ण शांततेमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली असून यामध्ये काही ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडल्या होत्या; परंतु झोनल अधिकार्यांकडून त्या तात्काळ बदलण्यात आल्या.
2 लाख 31 हजार 675 मतदारांनी बजावला हक्क
पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण 4 लाख 29 हजार 351 पैकी पुरुष 2 लाख 24 हजार 905 व महिला 2 लाख 4 हजार 416 मतदार आहेत. दरम्यान, 421 बुथ केंद्रांवर झालेया मतदानात 1 लाख 28 हजार 524 पुरुष तर 1 लाख 31 हजार 40 महिला एकूण 2 लाख 31 हजार 675 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.