पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत पुन्हा एकदा शिवाजी खांडेकर यांच्यावर शिक्षकेतर कर्मचारी यांनी विश्वास कायम ठेवत एकहाती सत्ता दिली. सिंहगड रोड येथील राष्ट्र सेवा दलाच्या रावसाहेब पटवर्धन विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथे ही निवडणूक पार पडली. खांडेकरांच्या नेतृत्वाखाली महामंडळाच्या निवडणुकीत १४ जागा बिनविरोध निवडून आल्या असून उर्वरीत ३ जागांवर झालेल्या निवडणूक प्रक्रियेत तीनही उमेदवार बहुसंख्य मतांनी विजयी झाले आहेत.
यामध्ये अनिल माने यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. शिवाजी खांडेकर यांची सरकार्यवाह पदी सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड झाली. मोरेश्वर वासेकर (कार्याध्यक्ष), रवींद्र गवळी, सरिता कुलकर्णी, प्रिया पवार (उपाध्यक्ष), देविदास पंडागळे, गोवर्धन पांडूळे, गजानन नानचे, जिवनदास सार्वे, विजय ताले, राजेश्वर चापुले (उपकार्यवाह), श्रीकांत पावणे (प्रसिध्दी प्रमुख), रामचंद्र केळकर (अंतर्गत हिशोबनिस) यांची बिनविरोध निवड झाली.
श्रीधर गोंधळी हे १३४ मते, खैरुद्दीन सय्यद हे १३१ मते मिळवत उपाध्यक्षपदी विजयी झाले. ज्ञानेश्वर महाले हे १२२ मते, संजय कावळे हे १२९ मते मिळवत उपकार्यवाहपदी निवडून आले. जुनी पेन्शन योजना,शिक्षकेतर सेवकांचे प्रश्न,शैक्षणिक धोरण व त्यातील अडचणी सोडवणेस राज्य शिक्षकेतर महामंडळाच्या वतीने मोठया ताकतीने लढा उभारुन न्याय देणार असल्याचे नूतन पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी राज्य महामंडळाचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून प्रसन्न कोतुळकर यांनी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रमेश इंगवले, देवेंद्र पारखे , इम्राण मुल्ला, निलेश पारकर, रामगोंडा खोत यांनी काम पाहिले. यशस्वीतेसाठी पुणे जिल्हाध्यक्ष विनोद गोरे, सुखदेव कंद, माजी अध्यक्ष नारायण गवळी, बाबा गडगे, आप्पासाहेब खराडे, भाऊसाहेब थोटे, पांडुरंग चिंचोलकर, सतिश नाडगौडा, एस एम पाटील, गोपाळ पेंडकर आदी पदाधिकारी, राज्यातील सर्व जिल्हाअध्यक्ष, सचिव, पदादिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.