पट्ठ्याने शेवटी का होईना डोळ्यातून पाणी काढले Rohit Pawar on Ajit Pawar।
\nदरम्यान, रोहित पवार भावनिक झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मी तुझ्या पेक्षा पावसाळे जास्त पाहिलेत असे अजित पवारांनी म्हटले. तसेच रोहित पवारांची नक्कलदेखील केली. पट्ठ्याने शेवटी का होईना डोळ्यातून पाणी काढले असे म्हणत टोला लगावला. त्यांच्या या टीकेला आता पुन्हा एकदा रोहित पवारांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
\n\n\n🔰05-05-2024 🛣️ बारामती
\n
\n⏱️ बारामती लोकसभा क्षेत्र | बारामती येथे आयोजित महायुतीची जाहीर प्रचार सांगता सभा
\nhttps://t.co/f3EcaQOndW— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) May 5, 2024
“वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही” Rohit Pawar on Ajit Pawar।
\nअजित पवारांनी नक्कल केल्याचा उल्लेख करत रोहित पवारांनीही त्यांना कुटुंबाची आठवण करून देत प्रत्युत्तर दिलं आहे. “अजितदादा, तुम्ही माझी नक्कल केल्याचं समजलं. पण ईडीची नोटीस आल्यावर तुमच्या डोळ्यांत आलेल्या अश्रूंप्रमाणे माझे मगरीचे नक्राश्रू नाहीत. माझ्या डोळ्यांतील अश्रू हे तुम्ही पक्ष फोडल्यानंतर शरद पवार जे बोलले ते शब्द ऐकून आलेले खरे अश्रू आहेत. त्यासाठी विचार, काळीज, जिवंत मन आणि अंगात माणूसपण असावं लागतं”, असं रोहित पवार यांनी ट्विटरवर पोस्टमध्ये म्हटलं आहे. शिवाय, “वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही”, अशी खोचक टीकाही त्यांनी केली आहे.
हेही वाचा
\nरोहित पवारांना अश्रू अनावर; अजित पवारांनी नक्कल करत म्हंटले ‘रडीचा डाव…’