आमदार रोहित पवरा : कृषीकला भेट देत केली पाहणी
बारामती – सध्या दुष्काळी परिस्थिती आहे आणि शेतकर्याला कमी खर्चाचे तंत्रज्ञान बारामतीतील कृषी प्रदर्शनात उपलब्ध असल्याने शेतकर्यांनी ते पाहून घ्यावे व आपल्या शेतात अवलंब करावा. या ठिकाणचे फार्म ऑफ फ्युचर- भविष्यातील शेती कशी असेल याबाबत शेतकर्यांनी नक्की हे प्रदर्शन पाहावे, असे आवाहन आमदार रोहित पवार यांनी केले.
कृषीक प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी कोकण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकर्यांनी प्रदर्शनास सहभाग नोंदवला. शेतकर्यांना या प्रदर्शनात नाविन्यपूर्ण विषय असलेला शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर बाबत शेतकरी उत्स्फुर्तपणे माहिती घेतली.
जमिनीमध्ये सेंसर तंत्रज्ञान कसे काम करते, त्याचा वापर कसा पिकांसाठी आवश्यक असलेले विविध घटक योग्य वेळेत योग्य प्रमाणात अचूक रित्या कसे मिळतात, त्यासाठी येणारा खर्च, त्याचबरोबर आमची शेती एक ते दोन एकरच आहे त्याला हे तंत्रज्ञान आम्हाला सहजरीत्या वापरता येईल का व ते आम्हाला परवडेल का यासारखे प्रश्न विचारत त्यांनी तज्ज्ञांकडून माहिती घेतली.
आपल्यासारख्या छोट्या शेतकर्यांनाही हे तंत्रज्ञान वापरता येऊ शकते आणि सध्या मोबाइलच्या जगामध्ये आपणही सहज ते वापरू शकतो, असा विश्वास शेतकर्यांनाही आला आणि त्यानी याबाबत समाधान व्यक्त केले. सोमवार (दि. 22) पर्यंत हे प्रदर्शन शेतकर्यांना खुले आहे. शनिवारी (दि. 20) व रविवारी (दि. 21) हॉर्स शो आयोजित केला असून शेतकर्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी केंद्रासह अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी केले आहे.
हे आहे आकर्षणाचे केंद्रबिंदू
तुर्कस्थान येथील 3 फुटी कणीस असलेली बाजरी, लाल केळी, ब्लू जावा केळी, ड्रोन ए. आय. मॉनीटर, फुलशेती उस्फुर्तपणे पहिली. जनावरांच्या प्रदर्शनामध्ये मुका देणारी काजळी खिलार बैल खुपच आकर्षण ठरले आहे. पुंगनूर गाय, कपिला खिलार, लाल खांदारी वळू, सहिवाल, देवणी गाय व काश्मिरी, आफ्रिकन शेळ्या पाहण्यासाठी उत्कृष्ट आहेत.