श्री भैरवनाथ, श्री खंडोबा महाराजांचा उत्सव जल्लोषात
चिंबळी – कुरुळी (ता. खेड) येथील ग्रामदैवत श्रीभैरवनाथ महाराज व श्री खंडोबा महाराजांच्या उत्सवानिमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमासह कुस्ती आखाड्याद्वारे उत्सवाची सांगता करण्यात आली.
कुरुळीत उत्सवानिमित्त गावातील सर्व मदिरांवर विद्युत रोषणाई करून मंडप उभारण्यात आला होता. बुधवारी (दि. 1) पहाटे मंदिरात 4 ते 6 श्रींची आरती काकड आरती, सकाळी 7 ते 9 महापूजा, अभिषेक व आरती करण्यात आली. सकाळी 9 ते 11 देवास हारतुरे व मांडव डहाळे, दुपारी 12 वा श्रींची आरती, 4 वाजता देवाचे 12 गाडे ओढण्यात आले.
रात्री 10 ते 11 श्रींची पालखी मिरवणूक व शोभेच्या दारूची आतषबाजी करून करमणुकीसाठी विठाबाई भाऊ (मांग) नारायण गांवकर यांचा लोकनाट्य तमाशा ठेवण्यात आला होता. गुरुवारी (दि. 2) सकाळी 9 लोकनाट्य तमाशाचा हजेरीचा कार्यक्रम पार पडला. दुपारी 4 ते 7 निकाली कुस्त्यांचा आखाडा रंगला होता.
यासाठी 101 ते 10 हजार रुपयांपर्यंत रोख स्वरूपात बक्षीस देण्यात आले. तर रात्री 8 वा करमणुकीसाठी गौरी पुणेकर प्रस्तुत जल्लोष लावण्यवतिंचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थ व यात्रा कमिटीच्या वतिने करण्यात आले होते.