Sharad Pawar Health Updates| लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. शरद पवार देखील मागील काही दिवसांपासून प्रचार सभांमध्ये व्यस्त होते. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या फूटीनंतर पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक पार पडत आहे. महाविकास आघडीकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली जात आहे.
शरद पवार ठिकठिकाणी दौरे करून सभा घेत आहेत. दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ रविवारी बारामती येथे शरद पवार यांनी सभा घेतली. मात्र, जेव्हा ते भाषणाला उभे राहिले, तेव्हा त्यांना थकल्यासारखे वाटत होते. यानंतर त्यांच्या आजच्या सर्व सभा रद्द करण्यात आल्या. यानंतर आता रोहित पवार यांनी शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली आहे.
काय म्हणाले रोहित पवार? Sharad Pawar Health Updates|
गेल्या 20 दिवसांपासून शरद पवार निवडणूक प्रचारासाठी रात्रं-दिवस फिरायचे. निवडणुकांच्या काळात ते केवळ 4 तास झोपायचे. पण आता शरद पवार यांची तब्येत चांगली आहे. परंतु पुढील दोन दिवस डॉक्टरांनी त्यांना भाषण करण्यास मनाई केली आहे, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली आहे. याशिवाय आज बीड आणि पुण्यात त्यांची सभा होणार होती. मात्र, प्रकृती अस्वास्थेमुळे त्यांचे आजचे सर्वच दौरे रद्द करण्यात आल्याचेही रोहित यांनी सांगितले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये निलेश लंके यांच्या प्रचारादरम्यान आपला घसा बसल्याचे शरद पवार यांनी सांगितले होते. मात्र, तरीही ते थांबले नाही आणि प्रचार सभा सुरूच ठेवल्या. पण या निवडणूक दौऱ्यांचा व सभांचा ताण पडल्याने त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना आरामाची गरज आहे, असे डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द झाले आहेत.
हेही वाचा:
काँग्रेस नेत्याने कार्यकर्त्याच्या मारली कानशीलात; भाजपने साधला निशाणा, जाणून घ्या नेमकं काय घडलं?