पुणे – लडाखमध्ये भारत-चीन हिंसाचारात २० जवान शहीद झाल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे. यातच चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहर शिवसेनेच्या वतीने चीनच्या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे.
पुण्यातील रास्ता पेठ येथील पॉवर हाऊस येथे शिवसेनेच्या वतीने चिनी वस्तूंची तोडफोड करण्यात आली. तसेच चीनचा झेंडा जाळून आपला संताप व्यक्त करण्यात आला.