Rajan Vichare Property| ठाणे लोकसभा मतदार संघातून उद्धव ठाकरे गटाकडून राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र अद्याप महायुती कडून ठाण्यासाठी अधिकृतरित्या उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. परंतु राजन विचारे यांनी प्रचाराला सुरुवात करत आपला उमेदवारी अर्ज देखील जाहीर केला आहे. अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपली संपत्ती 25 कोटी 82 लाख 97 हजार असल्याचे जाहीर केली आहे.
राजन विचारे यांची 2024 मध्ये एकूण संपत्ती किती?
मागील निवडणुकीत त्यांनी जाहीर केलेल्या मालमत्तेशी तुलना करता त्यांच्या संपत्तीत पाच वर्षात 11 कोटी 23 लाख 16 हजार 802 रुपयांनी वाढ झाली. राजन विचारे यांची एकूण संपत्ती 25 कोटी 82 लाख 97 हजार अइतकी आहे. तर रोख रक्कम 1,20,000 आणि पत्नीकडे रोख रक्कम 60,000 हजार रुपये आहे. जंगम मालमत्ता 1,32,55,125, पत्नीकडे जंगम मालमत्ता 2,40,32,502 स्थावर मालमत्ता 5,64,45,503, पत्नीकडे स्थावर मालमत्ता 74,56,420 आहे. Rajan Vichare Property|
याशिवाय राजने विचारे यांच्यावर 3 कोटी 24 लाख 78 हजार 888 चे कर्ज आहे. तर पत्नीकडे 94 लाख 20 हजार 232 रुपयांचे कर्ज आहे. वारसा हक्काने मिळालेली 16 लाख 94 हजार 631 रुपये इतकी संपत्ती आहे. तर त्यांच्यावर 6 फौजदारी गुन्हे आहेत. तर त्यांचे शिक्षण एफ.वाय.जे.सी झाले आहे. राजन विचारे यांच्याकडे हुंदाई वेरणा, पत्नी नंदीनीच्या नावे इनोव्हा क्रीयस्टा, महिंद्रा स्कॉर्पिओ आहे. Rajan Vichare Property|
तर रत्नागिरी येथील पोमेंडी आणि अलिबाग येथील अक्शी येथे त्यांची शेतजमीन आहे. याशिवाय ठाण्यातील चरई भागातील रोझ वूड, दिघे चौकात दुकान, मिरा-भाईंदर येथील गौरव गार्डन येथे दोन दुकान त्यांच्या नावावर आहे आणि पत्नी नंदिनी विचारेंच्या नावे जांभळीनाका येथील आत्माराम टॉवरमध्ये दुकान, चेंदणी येथील ठाकूर निवासमध्ये दुकान आहे.
राजन विचारे यांची 2019 मध्ये एकूण संपत्ती किती होती?
राजन विचारे यांची 2019 मध्ये एकूण संपत्ती 14 कोटी 59 लाख 80 हजार 198 रुपये होती. जंगम मालमत्ता 2,01,15,200 आणि पत्नी नंदिनी यांची जंगम मालमत्ता 2,82,93,363 इतकी होती. रोख रक्कम 2,00,000 याशिवाय त्यांच्यावर 4 कोटी 18 लाख 57 हजार 461रुपये होते. त्यांच्यावर 9 फौजदारी गुन्हे दाखल होते. त्यांच्याकडे फोर्ड एंडेवर, मर्सिडीज बेंझ ही वाहने होती. तर पत्नी नंदीनीच्या नावे टोयोटा फोर्चुनर, इनोव्हा क्रीयस्टा, महिंद्रा स्कॉर्पिओ ही वाहने आहेत.
तर रत्नागिरी येथील पोमेंडी आणि अलिबाग येथील अक्शी येथे शेतजमीन आणि ठाण्यातील चरई भागातील रोझ वुड आणि जय जगदंबा अपार्टमेंटमध्ये दुकान, पत्नी नंदिनीच्या नावे जांभळीनाका येथील आत्माराम टॉवरमध्ये दुकान, जय जगदंबा अपार्टमेंटमध्ये दुकान, चेंदणी येथील ठाकूरनिवासमध्ये दुकान होती.
दरम्यान, ठाण्यातील ही निवडणूक राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राजन विचारे यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. मात्र अद्याप तरी महायुतीकडून येथे उमेदवार जाहीर न झाल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
हेही वाचा: