बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिज अलीकडेच एका मोठ्या मासिकाच्या कव्हर पेजवर झळकली होती. यात तिचा फंकी आणि कूल लूक चाहत्यांना खूपच आवडला होता. अभिनेत्रीने शेअर केलेल्या तिच्या बीटीएस (बिहाइंड द सीन किंवा पडद्या मागील) व्हिडिओमध्ये एक परफेक्ट शॉट कसा मिळविला जातो हे दर्शविण्यात आले. यामध्ये जॅकलिन नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे. तिचा लूक स्पोर्टी आणि ग्लॅमरचा परफेक्ट कॉम्बिनेशन आहे.
जॅकलीन फर्नांडिजने एक फॅशन आयकॉन म्हणून काम केलेले आहे. तसेच सतत काहीतरी वेगळे आणि विशेष असा फॅशन स्टेटमेंटसाठी ती नेहमीच प्रेक्षकांमध्ये चर्चेत राहिली आहे. या लॉकडाऊनमध्ये जॅकलिनही खूप व्यस्त आहे. स्वतःला वेगवेगळ्या कामांमध्ये ती व्यस्त ठेवून आपल्या वेळेचा पुरेपूर वापर करत आहे.
एका प्रसिद्ध मासिकने सोशल मीडिया पेजवर तिचा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, “जॅकलिन फर्नांडिजचा ऍथलेटिक लुकसह ग्लॅमरचा तडका पाहण्यासाठी आमच्याशी संपर्कात रहा. आणि हेही पहा.’
दरम्यान, जॅकलिनने सलमान खानपासून अक्षय कुमार आणि रणबीर कपूरसारख्या आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केलेले आहे. जॅकलिनला अखेरच्या वेळी नेटफ्लिक्सच्या मिसेज सीरियल किलरमध्ये झळकली होती. यातील तिच्या अभिनयाची सर्वत्र स्तुती करण्यात आली होती.