वाघोली : भाजपा पुणे जिल्हा युवा मोर्चाच्या वतीने राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते असे वादग्रस्त वक्तव्य करून शिवभक्त व शंभूभक्तांच्या भावना दुखावल्या त्याचा निषेध करण्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळ श्रीक्षेत्र तुळापूर येथे निषेध आंदोलन करण्यात आले.
यावेळी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष किरण दगडे पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस सुदर्शन चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण काळभोर, प्रदेश सचिव गणेश कुटे, तालुका कार्याध्यक्ष शाम गावडे, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, पूनम चौधरी, उमेश मोरे, राजेंद्र राखपसारे,
दिनेश हरगुडे, रोहित खैरे,सुरज चव्हाण, शिंदे गटाचे विपूल शितोळे, ओंकार कंद, नितीन गव्हाणे, संदेश जाधव, जीवन साखरे, गणेश वांजळे, केतन जाधव,अविनाश सातव, युवराज गायकवाड, आण्णा राजे शिवले, शिवले ताई , युवा मोर्चाचे मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.