Lok Sabha Election 2024 । लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. यानंतर आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान येत्या 7 मे रोजी पार पडणार आहे. महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात 11 जागांवर मतदान पार पडणार आहे.अशात महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतांना दिसत आहे.
अशातच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे गटावर गंभीर आरोप केले आहे. उद्धव ठाकरे गटानं त्यांच्या जाहिरातीमधे पॉर्न कलाकाराचा वापर केल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. पॉर्न फिल्म्समधे काम करणारी व्यक्ती कुणाशी संबंधित आहे का, ही फिल्म बनवणारी कंपनी मातोश्रीवर कुणाशी संबंधित आहे का? असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.
Lok Sabha Election 2024 । नेमकं काय म्हणाल्या चित्रा वाघ…
शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे गटाने एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये महिला अत्याचारासंबंधी प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्यारून चित्रा वाघ यांनी निशाणा साधला. ‘अदूबाळ नाईट लाईफ प्रायव्हेट लिमिटेड च्या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आलेलं एक पात्र हा एक पॉर्न स्टार आहे. आणि तोच या जाहिरातीमध्ये विचारतो की महिलांवरचे अत्याचार कधी थांबणार ? आणि हाच इसम लहान वयाच्या मुलींसोबत अश्लील चित्रीकरण करतोय. या जाहिरातीत वडिलांच्या भूमिकेत जो व्यक्ती आहे , त्याचे ‘उल्लू’ ॲपवरील एका वेबसीरिजमध्ये नको ते कृत्य करतानाचे व्हिडीओ, क्लिप्स आहेत. अशा माणसाला घेऊन त्यांनी ( ठाकरे गटाने) महिला अत्याचारावरची जाहिरात कशी केली ‘ असा सवाल वाघ यांनी विचारला.
हे वाचाल का ? ‘तर भाजपला मत दिलेले बरे…’ काँग्रेस नेत्याचा वक्तव्यामुळे खळबळ