नेवासा : नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानमध्ये टाटा कंपनीचे मदतीने सौर ऊर्जा प्रकल्प राबविण्यात येणार असून त्यासाठी दहा लाख रुपये खर्च येणार असल्याची माहिती संस्थांनचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी दिली.
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानमध्ये सौर ऊर्जा प्रकल्पा उभारणीचे भूमिपूजन निकम महाराज यांचे हस्ते झाले. यावेळी संस्थांनचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, कृष्णाजी पिसोटे, माधवराव दरंदले, भिकाभाऊ जंगले, ज्ञानेश्वर माऊली शिंदे,रामभाऊ जगताप, कैलास जाधव, जामदार गुरुजी, डॉ. दरंदले व संस्थांनचे व्यवस्थापक भगवान सोनावणे, जनसंपर्क अधिकारी भैय्या कावरे, संदीप आढाव, भाऊराव समोसे आदी उपस्थित होते.
अधिक माहिती देताना श्री.अभंग पुढे म्हणाले की, नवीन वर्षाच्या प्रारंभी संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानने नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून प्रतिदिन 60 युनिट विज निर्मितिचा सौर ऊर्जा प्रकल्प हाती घेतला आहे.
प्रकल्पाच्या माध्यमातून महिन्याला 1800 युनिट वीज निर्माण होईल अशी वारंटी व गॅरंटी टाटा कंपनीने दिलेले आहे. यामुळे संस्थांनवर येणारा विज बिलाचा भार पूर्णपणे कमी होईल. या प्रकल्पासाठी सुमारे दहा लाख रुपये खर्च येणार आहे.