नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांनी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना बंदुकीचा परवाना मंजूर केला आहे. त्यांना प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल पक्षातून गेल्या वर्षी निलंबित करण्यात आले होते.
नुपूर शर्मा यांनी शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला होता. त्यांना येणाऱ्या धमक्यांचे मुल्यांकन करून आणि योग्य त्या प्रक्रियेचे पालन करून त्यांचा शस्त्र परवाना मंजुर करण्यात आल्याचे दिल्ली पोलिसांच्यावतीने सांगण्यात आले आहे.
आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणात नुपूर शर्मा यांच्या विरोधात देशभरात अनेक एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्या या वक्तव्याला काही मुस्लिम देशांच्यावतीनेही आक्षेप घेण्यात आल्यानंतर भाजपने त्यांना पक्षातून निलंबीत केले होते.
Delhi : आम आदमी पक्षाच्या नेत्यांची बॅंक खाती जप्त करा; भाजपने केली मागणी
तसेच भाजपच्या दिल्ली युनिटचे मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांची हकालपट्टी केली. नुपूर यांनी आपल्याला सतत धमक्या येत असल्याची तक्रार पोलिसांत केली होती, त्यानुसार त्यांना सुरक्षा देण्यात आली आहे.