मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघाची मालकीन प्रिता झिंटा ही सध्या आयपीएल 2020 चा सिजन सुरु असल्याने दुबईत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय कडून खेळाडू आणि इतर संघ मालक यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे.
दरम्यान, नुकतंच किंग्स इलेव्हन पंजाब संघाची मालकीन प्रिता झिंटा हिने आपली कोरोना चाचणी केली आहे. प्रितीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर कर याबद्दल माहिती दिली आहे. या व्हिडीओमध्ये प्रिती कोरोना टेस्ट करताना दिसत आहे. प्रितीबरोबर या व्हिडीओमध्ये पीपीई किट परिधान केलेली मेडिकल स्टाफमधील एक महिला आहे, जी प्रितीची कोरोना टेस्ट करत आहे.
प्रितीने या व्हिडिओ म्हंटल आहे कि, “कोरोनाची ही माझी 20 वी टेस्ट असून मी आता कोरोना टेस्टची क्विन झाली आहे.आयपीएल टीम सोबत असणं याबद्दल सर्वजण मला विचारत असतात. याची सुरुवात 6 दिवसांच्या क्वारंटाईनपासून झाली. दर 3-4 दिवसांनी कोविड ची टेस्ट करावी लागते. बाहेर फिरायला जाण्यास बंदी आहे. हॉटेल रुम, किंग्स इलेव्हन पंजाब संघाचे रेस्टॉरंट, जीम आणि कार याव्यतिरीक्त तुम्ही कुठेही जावू शकत नाही.