#Viralvideo : पुराच्या पाण्यासोबत घरामध्ये आले मासे

हैदराबाद  –    बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे महाराष्ट्रा,  हैदराबादसह अनेक राज्यांना या बदलत्या हवामानाचा मोठा फटका बसला. सतत सुरू असलेल्या मुसळधार पासवामुळे या भागातील अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.

नदीचं पात्राबाहेर पाणी वाढल्यानं नदीतील मगरी, साप आणि मासे देखील पुराच्या पाण्यासोबत रस्त्यावर घरांमध्ये आल्याचे व्हिडियो सुद्धा सोशल मीडियावर वायरल होत आहे.


यातच सोशल मीडियावर  पुन्हा एक व्हिडियो व्हायरल झाला आहे. घरांमध्ये शिरलेल्या पुराच्या पाण्यासोबत मासे देखील आल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ हैदराबादमधील असल्याचं सांगितलं जात आहे .

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.