Popular Global Leaders : पंतप्रधान मोदींच्या (pm modi) नेतृत्वाबाबत भारताने पुन्हा एकदा जगात बाजी मारली आहे. मॉर्निंग कन्सल्टच्या ग्लोबल लीडर अप्रूव्हल सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहचले आहे
मॉर्निंग कन्सल्टच्या ग्लोबल लीडर अप्रूव्हलने केलेल्या सर्व्हेमध्ये पंतप्रधान मोदींना (pm modi) सर्वाधिक म्हणजेच ७६ टक्के रेटिंग मिळाले आहे. तर. या यादीत स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष अलेन बेरसेट दुसऱ्या क्रमांकावर आहेत, ते पंतप्रधान मोदींच्या (pm modi) तुलनेत १२ टक्के खाली आहेत.
विशेष म्हणजे या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन हे सातव्या क्रमांकावर आहेत. त्यांना 40% रेटिंग मिळाले आहे जे त्याचे मार्चपासूनचे सर्वोच्च रेटिंग आहे.
6 ते 12 सप्टेंबर (2023) दरम्यान गोळा केलेल्या डेटामध्ये, पंतप्रधान मोदींचे (pm modi) नापसंत रेटिंग देखील जगातील सर्वात कमी आहे. म्हणजेच फक्त 18% लोकांनी त्यांना नापसंत केले आहे. तर या यादीतील शीर्ष 10 नेत्यांमध्ये, कॅनडाच्या जस्टिन टुडूचे सर्वात जास्त 58% अप्रूव्हल रेटिंग आहे.
मॉर्निंग कन्सल्ट ही राजकीय बुद्धिमत्ता संशोधन संस्था आहे. जगभरातील 22 नेत्यांवर सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यू सिओक-युल आणि झेक प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष पेट्र पावेल यांना सर्वात कमी रेटिंग म्हणजे फक्त 20%. पसंती देण्यात आली आहे.